-
-
Maharashtra Energy Development Agency (MEDA) Government of Maharashtra Institution
Maha Krushi Urja Abhiyan -PM Kusum Yojana : Beneficiary Registration Form
-
© 2022 All rights reserved
महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना सद्य:स्थिती
महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 100000 सौर पंपांची योजना सुरु झाली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून अद्याप पुरवठादार कंपन्या व दर अंतिम झालेले नाहीत, त्यास एक महिना कालावधी लागण्याची शक्यता आहे (डिसेंबर, 2021 अखेर).
दरम्यान केंद्र शासनाचे सुचनेप्रामणे मागील वर्षाचे पुरवठादार, मागील वर्षाचे दराने सौर पंप पुरविणेस तयार असतील अशा पुरवठादारांकडून देकार मागवून 2750 सौर पंपासाठी प्रथम आलेल्या अर्जदारास प्राधान्य देऊन त्याची कार्यवाही सुरु आहे.
केंद्र शासनाकडून या वर्षीचे पुरवठादार कंपन्या व दर आलेनंतरच या पुरवठादारांना जिल्हानिहाय कोटा वाटप केल्यानंतर योजनेची अपेक्षित कार्यवाही सुरु होईल. तोपर्यंत अर्जदारांची प्राथमिक माहिती / मोबाईल नोंदणी करणेत येत आहे.
केंद्र शासनाकडून सौर पंप पुरवठादार व दर ठरवून मिळाले व राज्य शासनाचे सुकाणू समितीकडून जिल्हानिहाय पुरवठादारास वाटप झालेनंतर अर्जदारांना प्राधान्यक्रमानुसार SMS पाठविणेत येतील. त्यानंतरच अर्जदारांची संपूर्ण माहिती भरणे, कोटेशन देणे, लाभार्थी हिस्सा स्विकारणे, कंपनी निवडणे व सौर पंप आस्थापित करणे ह्याबाबी शक्य होतील.
सद्य:स्थितीत होणाऱ्या विलंबा बाबत दिलगीर आहोत.
महाऊर्जा/ मेडा